जळगावमहानगरसांस्कृतिक

देविदास कॉलनी मित्र मंडळा तर्फे गणेशोत्सव निमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा; महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जादूगर अविनाश कृत अविष्कार इव्हेन्ट मॅनेजमेन्टस् तर्फे आयोजन

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२ सप्टेंबर २०२५ :जळगांव येथील पंचमुखी हनुमान मागील सेंट लॉरेन्स स्कूल शेजारील देविदास कॉलनीतील देविदास कॉलनी मित्र मंडळा तर्फे गणेशोत्सव निमित्त खास महिलांसाठी जादूगर अविनाश कृत अविष्कार इव्हेन्ट मॅनेजमेन्टस् होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गप्पागोष्टी, रंजक खेळ, कॉमेडीचा तडका सोबत घेऊन मनोरंजन सादर करण्यात येणार आहे. विजेत्या महिलांना पैठणी तसेच सोबतच इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

दि. ०३ सप्टेंबर २०२५, बुधवार – वेळ संध्या ७.३० वा.
देविदास कॉलनी, सेंन्टलॉरेन्स स्कुल जवळ, जळगांव येथील देविदास कॉलनी मित्र मंडळाच्या गणेशोत्सव मंडळा जवळ सादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सहभागी होण्याचे देविदास कॉलनी मित्र मंडळा तर्फे अध्यक्ष स्वप्निल जगताप आणि जादूगर अविनाश कृत अविष्कार इव्हेन्ट मॅनेजमेन्टस् तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button