जळगावजिल्हा परिषद

जिल्हा परिषद नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार

पहिल्याच दिवशी विविध विभागांना दिल्या भेटी

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे अभियान संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुक्रवारी करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली.

पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’

पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही इमारतीतील सर्व विभागांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील टेबलवर जाऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली व कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button