रत्नागिरीशैक्षणिक

राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त शिक्षक योगेश नाचणकर यांचा रत्नागिरीत गौरव

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २७ मार्च २०२५ |
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.25 मार्च 2025 रोजी माध्यमिक पतपेढी रत्नागिरी या ठिकाणी संपन्न झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयातील तंत्रस्नेही,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक योगेश चंद्रकांत नाचणकर यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक, तालुकास्तरावर 3 री ते 5वी भाषा: प्रथम क्रमांक,6 वी ते 8 वी भाषा द्वितीय क्रमांक, 9वी ते 10वी भाषा :प्रथम क्रमाक व जिल्हास्तरावर 3री ते 5वी भाषा: प्रथम क्रमाक,9वी ते 10वी भाषा:प्रथम क्रमांक,11वी ते 12वी भाषा:प्रथम येण्याचा मान पटकावला आहे..

सुशील सुरेश शिवलकर डाएट प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी, राजेंद्र सुभाष लठ्ठे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी, अध्यक्ष माध्यमिक शिक्षक पतपेढी रत्नागिरी सागर पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम,सन्मानचिन्ह,व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक,संस्थेचे जेष्ठ संचालक शांताराम खानविलकर,संस्थेचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर,पर्यवेक्षक पांडुरंग पाटील,आसावरी राजेशिर्के,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक,व विद्यार्थी यांच्या वतीने गौरव करण्यात आला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button