जळगांव जिल्हामहाराष्ट्रराजकिय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निघाला भव्य जन आक्रोश मोर्चा

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्यांचा डाव

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.११ ऑगस्ट २०२५ :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत विविध मागण्यांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे शेतकऱ्यांचा बंद केलेला पिक विमा पुन्हा सुरू करावा यासह अनेक मागण्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केल्या.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला पत्त्यांचा डाव

माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत महत्त्वाचे विषय सुरू असताना रमीचा गेम खेळत असतानाचे व्हिडिओ माध्यमावर व्हायरल झाल्याने तीव्र संतापाची लाट महाराष्ट्रभर उमटली. त्याचा निषेध म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, उपमहागर प्रमुख प्रशांत सुरळकर या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, महानगर प्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महिला आघाडी महानगरप्रमुख मनीषा पाटील, उपमहागर प्रमुख नेता सांगोळे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जकिर पठाण, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहानगरप्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, कुसुंबा उपसरपंच प्रमोद घुगे, धरणगाव माजी नगराध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, फिरोज पठाण, शोएब खाटीक, किरण भावसार निलेश ठाकरे, बाळा कणखरे, विजय बांदल, राहुल पार्क विजय राठोड जैनुद्दीन शेख, लखन सांगिले, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, पप्पू तायडे, राकेश माळी, बिरजू शिरसाठ, शरद पाटील, गोलू पाराये, राहुल खवडे,भगवान धनगर,गुलाबराव कांबळे,सचिन चौधरी, छगन खडसे,योगेश पाटील,डॉ.रमाकांत कदम,लोटन सोनवणे,प्रभाकर कोळी,योगेश चौधरी,आबा कोळी,राकेश घुगे,विनायक धर्माधिकारी,राजू जगताप,भीमराव पांडव आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी केले तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button