जळगांव जिल्हाविधानसभा निवडणूक

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात : ९२ उमेदवारांची माघार

सर्वाधिक २९ उमेदवार जळगाव शहर तर सर्वात कमी प्रत्येकी ८ उमेदवार चाळीसगांव मतदार संघात

लोकमाध्यम न्युज | जळगांव ४ नोव्हेंबर २०२४ |

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या २३१ उमेदवारीपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या आजच्या दि.४ नोव्हेंबर शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील ९२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार मतदार संघासाठी एकूण १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत प्राप्त झाली आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्य उमेदवारांची संख्या)

चोपडा-९ (७) रावेर-९ (१४), भुसावळ-९ (७) जळगाव शहर-२९ (८) जळगाव ग्रामीण-११ (६) अमळनेर-१२(४), एरंडोल-१३ (०७) ,चाळीसगाव-८ (८) पाचोरा-१२ (१२) जामनेर-१०(१२)मुक्ताईनगर-७ (१७) याप्रमाणे आहे.

सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदार संघात २३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते . दरम्यान मघारीच्या अंतिम दिवशी एकूण ९२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत .

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button