जळगावकाव्यसामाजिकसाहित्य

बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ३ डिसेंबर ला ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रम !

| लोकमाध्यम NEWS | जळगाव : जुने जळगाव येथील चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात गुरुवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त ‘स्मरण बहिणाईचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बहिणाईंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासह त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी प्रभाकर महाजन (बहिणाईंंचे ग्रामजीवन व त्यांची गाणी) आणि साहित्यिक अरविंद नारखेडे (लेवागणबोलीचा गोडवा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध चित्रकार तथा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजू बाविस्कर (चित्रकार ते साहित्यकार प्रवास) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी ठरलेल्या विषयानुसार वक्ते संवाद साधतील. या साहित्यिक कार्यक्रमास साहित्यप्रेमी आणि रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने समन्वयक अशोक चौधरी यांनी केले आहे.

बहिणाईंच्या कवितांमधून कान्हदेशची माती, तेथील लोकजीवन, संस्कृती आणि लेवागणबोलीचा गोडवा अनुभवायला मिळतो. त्यांच्या साहित्याचा हा अमूल्य ठेवा केवळ एका प्रदेशाची सांस्कृतिक ओळख नसून संपूर्ण मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करण्याबरोबरच हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ‘स्मरण बहिणाईचे’ या कार्यक्रमातून केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई व पणतसून स्मिता चौधरी, ट्रस्टचे विश्वस्त, चौधरीवाड्यातील बंधू-भगिनी, साहित्यिक, नूतन मराठा महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच अनुभूती-२ मधील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित असतील. अशा या थोर कवयित्रीच्या ७५व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी, खान्देशच्या साहित्यिक-सांस्कृतिक परंपरेचा गौरव करण्यासाठी साहित्यप्रेमी, रसिक आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button