जळगांव जिल्हाक्रीडा

जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. १७ : जैन इरिगेशन ह्या मानांकित कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून श्री. शिव छत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
योगेश धोंगडे याची गेल्या ५ वर्षातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल उल्लेखनीय कामगिरी आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने कालच ह्या पुरस्कारांची घोषणा केली.

योगेश धोंगडे यांच्या ह्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल त्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक अतुल जैन, प्रशासकीय क्रीडा अधिकारी अरविंद देशपांडे, क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, सुयश बुरकुल, कॅरम व्यवस्थापक सय्यद मोहसिन व इतर सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
सदर पारितोषिक वितरण दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे होणार आहे.
ह्याच बरोबर सन २०२२–२३ ह्या वर्षातील सर्व श्री.शिव छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंना ही पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यातही जैन इरिगेशनच्या संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर व नीलम घोडके ( माजी खेळाडू) ह्या तीन खेळाडूंचा समावेश आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button