जागतिक व्याघ्र दिनी शालेय विद्यार्थी रमले मानवी वाघांसोबत रावेर ते पाल वनक्षेत्रात जनजागृती
यावल वनविभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचा उपक्रम
लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.३० जुलै २०२४ |
जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्था जळगांव आणि वनविभाग यावल यांच्या सैयुक्त विद्यमाने आयोजित व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीस शालेय विद्यार्थ्यासोबतच गावकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला 28 जुलै रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी, आमदार राजू मामा भोळे , भरत अमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल उप वसंरक्षक श्री जमीर शेख यांच्या मार्गदर्शनात जळगाव येथून निघालेल्या मोटार सायकल रॅलीस दिनांक 29 रोजी रावेर तहसीलदार बंडू कापसे, वनक्षेत्रपाल अजय बावणे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल सोनवणे, सेवाभावी संस्था पदाधिकारी दीपक नगरे,
यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवली , केऱ्हाळे येथील आदर्श माध्यमिक विद्यालय येथे जनजागृती करण्यात आली.
उपस्थित विद्यार्थ्यांनी मानवी वाघांसोबत नृत्य करत सेल्फी घेतली विनोद ढगे आणि त्यांच्या पथकाने वाघ वाचवा जंगल वाचवा चा संदेश देत पथनाट्य सादर केले ग्रामपंचायत तर्फे व्याघ्र दुतांचा सन्मान करण्यात आला,
लाल माती , सहस्र लिंग, पाल , यथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले पाल कृषी विज्ञान केंद्रात सहभागी व्याघ्र दुताना सहाय्यक उप वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आभार प्रदर्शन सतीश कांबळे यांनी मानले
वाघ वाचवा जंगल वाचवा, रुबाबदार व्यक्तिमत्व या प्राण्यांचे अस्तित्व टीकवू वाघांचे , अशा घोषणा देत 5 वाजता रॅली चा समारोप करण्यात आला यावल वनविभाग कार्यालयात समारोप करण्यात आला
कार्यक्रमांचे प्रास्ताविक रवींद्र फालक यांनी केले सूत्र संचालन बाळकृष्ण देवरे यांनी केले आभार प्रदर्शन योगेश गालफाडे यांनी मानले,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , उमेद संस्थेचे वीरेंद्र छाजेर , वन्यजीव चे राजेश सोनवणे, मुकेश सोनार, जगदीश बैरागी, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, प्रदीप शेळके, वासुदेव वाढे, सतीश कांबळे, विजय रायपुरे, स्कायलेब डिसुझा, भरत शिरसाठ, निलेश ढाके, यांनी परिश्रम घेतले,
जनजागृती कार्यक्रमात उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन, वाशिम जिल्ह्यातील कोब्रा एडव्हेंचर, रायबा ट्रेकर्स ग्रुप, ठाणे जिल्ह्यातून होवोहम चॅरिटेबल ट्रस्ट, गुजरात येथील wcb फाउंडेशन, समर्पण संस्था, वन्यजीव संरक्षण संस्था नासिक, नांदगाव, निफाड, अकोला, गुजरात, वाशिम, मुंबई, पुणे येथून व्याघ्र दुत सहभागी झाले होते.