चोपडा तालुका ग्राहक पंचायत व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या बैठकीत लोकोपयोगी विषयांना मंजुरी

लोकमाध्यम न्युज जळगांव दि. २२ : चोपडा ग्राहक पंचायत महाराष्ट्र व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ अध्यक्ष अशासकीय सदस्य उदयकुमार अग्निहोत्री , यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच मासीक मिटिंग घेण्यात आली. या मध्ये विवीध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यात पुढील विषयांना मंजुरी देण्यात आली. गो शाळा दत्तक घेणे, शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविणे, रिक्षा भाडे विषयी निवेदन देणे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्गदर्शक बॅनर तयार करणे, शासकीय व अशासकीय कार्यालयात ग्रामीण भागातील गावांमध्ये बॅनर लावणे. जेणेकरून लोकांना मार्गदर्शना साठी सोईचे होईल. व प्रचार प्रसार मुळे ग्राहकांच्या समस्या लवकर सुटतील. अशा विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली आहे. ह्या मासीक मिटिंगला अशासकीय सदस्य कैलास महाजन, तालुका अध्यक्ष राजेश गुजराथी, संघटक अनिल बारी, तालुका सचिव भुपेंद्र गुजराथी, सचिव घन:शाम वैद्य, प्रबोधन मंत्री भालचंद्र साळुंखे, ग्रामीण प्रबोधन यशवंतराव बोरसे, प्रसिद्धी प्रमुख डाॅ.पृथ्वीराज सैंदाणे, मुकेश बडगुजर, इंदिरा सोनवणे, पुजा पाटील आदी पदाधिकारी आणि सर्व सदस्य उपस्थित होते.





