जळगांव जिल्हा

भुसावळ येथे रविवारी बामसेफचे राज्यस्तरीय अधिवेशन

बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांची उपस्थिती

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२३ ऑगस्ट २०२५ : (प्रतिनीधी) भुसावळ शहरात बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २४ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन कमल गणपती हॉल, शांतीनगर, येथे करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे, भुसावळ येथे होणाऱ्या अधिवेशनाची जय्यत तयारी झाली असून, जिल्ह्यासह राज्यात अधिवेशनाची जनजागृती व पत्रके वाटप करून हजारो कार्यकर्त्यांना अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले असल्याची माहिती जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुमित्र अहिरे यांनी दिली.या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम नवी दिल्ली, तर उद्घाटक म्हणून सत्यशोधक शेतकरी सभेचे महाराष्ट्र राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले हे उपस्थित राहणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील आयएमपीएचे राष्ट्रीय अध्यक्ष, मगन ससाणे, ॲड.राजेश झाल्टे , जळगाव, राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही. व्ही. जाधव, प्रभारी राष्ट्रीय समीक्षक दिपक वासनिक, भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय कार्याध्यक्ष माया जमदाडे, संदीप मानकर, बीएमपी युवा प्रकोष्ट राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार माने आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या अधिवेशनात पहिल्या सत्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना घोषित करणे, बीजेपी व काँग्रेसचे विविध षडयंत्र, शेतकरी, शेतमजूर, कामगार, रेल्वे व इतर कर्मचारी वर्गाच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून संविधानिक अधिकारांपासुन वंचित ठेवून सामाजिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण विषयावर विचार मंथन, बहुजन समाजाला साधनविहिन करुन दीर्घ गुलाम करण्याच्या षडयंत्रावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनास सर्व मुलनिवासी भारतीयांसह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य करावे,असे आवाहन महाराष्ट्र राज्य बामसेफ व सर्व सहयोगी संघटनांतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस बहुजन मुक्ती पार्टीसह विविध सहयोगी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button