जळगाव सायबर पोलीसांची मोठी कामगिरी — १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १९ ऑक्टोंबर २०२५ :जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत सायबर पोलीस स्टेशन, जळगाव यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत तब्बल १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६२ अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
सार्वजनिक ठिकाणे व बाजारपेठांमधून गहाळ झालेल्या महागड्या मोबाईलचा मागोवा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली होती.
या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक सतिष गोराडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोहेकॉ/३०६८ किरण वानखेडे, पोहेकॉ/१८६६ हेमंत महाडीक, पोना/२६१ सचिन सोनवणे, पोकों/१६७५ पंकज वराडे, पोकों गौरव पाटील, पोकों मिलींद जाधव व पोकों दिपक पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या टीमने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जाऊन बारकाईने शोध घेत एकूण ६२ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले. हस्तगत मोबाईल आज पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते संबंधित मालकांना परत देण्यात आले.
सायबर पोलीसांनी गहाळ मोबाईलचे IMEI क्रमांक व सविस्तर माहिती जळगाव पोलीसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड केली आहे.
पोलीस अधीक्षक, जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की — “मोबाईल हरवल्यास तात्काळ CEIR पोर्टलवर (Central Equipment Identity Register) त्याची माहिती अपलोड करा, जेणेकरून मोबाईल शोधणे सुलभ होईल.





