जळगांव जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

प्रशांत सुरळकर यांची प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी नियुक्ती

समाज बांधवांतर्फे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.२४ सप्टेंबर २०२५ :प्रदेश तेली महासंघाच्या नाशिक विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरेश सुरळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश तेली महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक नंदुरबार येथे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली या बैठकीत प्रशांत सुरेश सुरळकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी व पदाधिकारी यांनी त्यांची नाशिक विभागाच्या युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची घोषणा केली. या निवडीमुळे समाजातील तळागाळातील घटकाला न्याय दिल्याची भूमिका अनेकांनी बोलून दाखवली.

प्रशांत सुरळकर यांच्या निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी विक्रांत चांदवडकर प्रियाताई महिंद्रे धरणगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी श्यामकांत ईशी आदींसह समाजातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button