जागतिक महिला दिन कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असो तर्फे उत्साहात साजरा
महिला छायाचित्रकारांचा करण्यात आला सन्मान
कोल्हापूर दि.९ : कोल्हापूर जिल्हा छायाचित्रकार असोसिएशन तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील महिला छायाचित्रकारांना सन्मानित करण्यात आले.
महिला छायाचित्रकार रोहिणी अमोल पराडकर यांचा संसद रत्न खासदार धनंजय महाडिक यांच्या सुविद्य पत्नी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते मानपत्र, गुळाची ढेप, गुलाब पुष्प, व मानाची शाल देऊन ८ मार्च रोजी दैवज्ञ सभागृह मंगळवार पेठ कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.यावेळीआर्टिस्ट विजया मिस्त्री कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची दिप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत मनोळे यांच्या प्रस्ताविक भाषणानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ कोल्हापूरी गूळाचा रवा व मानपत्र देऊन उपस्थित सत्कारमूर्ती छायाचित्रकार महिलांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून अरुंधती महाडिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजया मिस्त्री यांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर म्हणून सत्करार्थी महिला छायाचित्रकारांनी आपले भावनिक मत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळाने या कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले होते.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत मनोळे, उपाध्यक्ष, संजय जोशी, कार्यवाह किशोर पालोजी, सर्व सभासद, हितचिंतक व मान्यवर परिवारासह उपस्थित होते.