जळगावसामाजिकसांस्कृतिक

भरारी फाउंडेशनच्या बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन संपन्न

आयोजनात क्रेडाई संस्थेचे महत्वपूर्ण योगदान

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. २४ जानेवारी २०२६ : भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५ दिवसीय बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी सुरवात झाली. याठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन  प्रमुख पाहुणे चैत्राम पवार यांनी उत्सवाचे उद्घाटन केले.

या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, सत्यनारायण बाबा मौर्य यांचा भारत माता की आरती, ह. भ. प रविकिरण महाराज यांचे किर्तन,देशभक्तीपर गीते, वहीगायन ,भावगीते , मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत  आपली कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स याठिकाणी असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धा झाली. चैत्राम पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खासदार स्मिता वाघ यांनी बहिणाबाई महोत्सवाच्या ११व्या पर्वाला शुभेच्छा दिल्या. आमदार सुरेश भोळे, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनिष जैन,अनिकेत पाटील,अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या उपाध्यक्षा संगीता पाटील,दिपक सराफ, नाबार्ड चे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, श्रीराम पाटील,डॉ . पी. आर . चौधरी,शैलेश मोरखडे, नगरसेवक दिपक सुर्यवंशी, जयश्री राहुल पाटील, माधुरी बारी, दिपक जोशी, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा,, विक्रांत चौधरी, पवन जैन सागर परदेशी यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे , डॉ. राजेंद्र देशमुख यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली . स्थानिक कलाकारांना कलांचे सादरीकरण केले. उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उद्योग व शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पुखराज पगारीया व निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच प्राचार्य मानसी गगडाणी यांनी शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज सायंकाळी साज मेकअप आर्टिस्ट स्टुडिओ संचलित ” मराठी संस्कृतीचा फॅशन शो” चे आयोजन करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button