डॉ. हेडगेवार नगर १९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन.
ना. गुलाबराव पाटील आणि ना.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
जळगांव दि.२० : डॉ. हेडगेवार नगर ,धरणगाव येथे १९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील तसेच व मदत पुनर्वसन मंत्री ना .अनिल पाटील यांच्या हस्ते दिनांक १८ रोजी भूमिपूजन करण्यात आले.
हेगडेवार नगर धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमातपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की डॉ. हेडगेवार नगर येथे पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होण्यासाठी मंजूर केलेली १९ कोटींची पाणीपुरवठा योजनेचा पाण्याचा स्त्रोत हा १२ किमी अंतरावरील अंजनी धरणावरून घेण्यात आला असून १२ किमीच्या मोठ्या पाईपलाईन सह गाव अंतर्गत पाईपलाईन, जलकुंभ व अनुषंगिक बाबींचा समावेश आहे. या योजनेचे तसेच पर्यटन योजनेतर्गत २ कोटीच्या जळगाव रोड ते क्रांतिकारी ख्वाज्याजी नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजनही पालकमंत्री गुलाबराव पाटील व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जल्लोषात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसरपंच चंदन पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या १९ कोटीच्या पाणी पुरवठा योजनेची सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी तर आभार भाजपच्या तालुका महिला सर चिटणीस दिक्षा गायकवाड यांनी मानले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदासजी पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, प्रांत कार्यवाहक आर, एन, महाजन सर, जेष्ठ नेते डी. जी. पाटील, हेगडेवार नगर सरपंच सविता सोनवणे, धनराज सोनवणे, उपसरपंच चंदन पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते सुभाष अन्ना पाटील, माजी सभापती पी. सी.आबा पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील , शेखर अत्तरदे, तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, जिजाबराव पाटील, भुसावळचे उद्योजक मनोज बियाणी,रोनक बियाणी,पियुष बियाणी, राजू पारीख, शिरीष बयास, भीमराव पाटील, भानुदास विसावे, कमलेश तिवारी, पप्पू भावे, मोहन पाटील, विलास महाजन, दिलीप महाजन, कन्हेया रायपुरकर, सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. पुंडलिक सपकाळे, मंगला महाजन, चारूशिला पाटील, भारती चौधरी, रेखापाटील, ग्रा. पं. सदस्य संभाजी सोनवणे, शीला देशमाने, स्वाती चौधरी, डॉ. हेडगेवार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.