जळगावअध्यात्मिकधार्मिक
सप्तशृंगी देवीला हलव्याचे अलंकार अर्पण; डोहोळे परिवाराचे सेवेचे सहावे वर्ष

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. २५ जानेवारी २०२६ : नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तशृंगी देवीला संक्रांत सणानिमित्त रथसप्तमीच्या दिवशी हलव्याचे अलंकार जळगांव येथील डोहोळे परिवारातर्फे अर्पण करण्यात आले. त्यांचे हे सेवेचे सहावे वर्ष होते.
डोहोळे परिवारात हलव्याचे अलंकार घडविण्याची तीन पिढ्यांची परंपरा आहे. तिसऱ्या पिढीतील अनघा अजय डोहोळे यांनी तयार केलेले हलव्याचे अलंकार आता साता समुद्रापार पोहोचले आहेत.
श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या भव्यतेनुसार हे अलंकार तयार करावे लागतात. सकाळच्या आरती आणि शृंगार प्रसंगी नेहमीच्या आभूषणांबरोबर हे हलव्याचे अलंकार परिधान केले जातात.
याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने अजय डोहोळे, अनघा डोहोळे, उषा डोहोळे, अनय डोहोळे, अथांग डोहोळे यांचा प्रसादरुपी सन्मान करण्यात आला.






