लोकमाध्यम न्युज | जळगांव ३० डिसेंबर २०२४ |
कालिंका माता चौकात झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे गेल्या दोन दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे. कारवाईच्या आजच्या सोमवार, 30 डिसेंबरच्या तीसऱ्या दिवशी पुन्हा कालिका माता मंदि ते इच्छादेवी चौकापर्यतच्या महामार्गाला लागुन असलेली अतिक्रमणे काढण्यात आली. या कारवाईसाठी प्रांतांधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनही रस्त्यावर उतरले होते.
कालिंका माता मंदिराजवळ अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या डंपरने दूचाकीस्वारास जोरात धडक दिली होती. त्यात एका चिमुरड्याचा जागीच जीव गेला होता. या घटनेमुळे जिल्हा, पोलीस आणि महापालिका प्रशासनाविरोधात जनमत तिव्र झाले होते. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरला होता.
अन् सुरू झाली कारवाई
या सर्व बाबीमुळे जिल्हा, पोलीस आणि महापालिका प्रशासनाने गुरूवार 26 डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व प्रकाराच्या अतिक्रमणांवर कारवाई करणे सुरू केले. कारवाईच्या पहिल्या दिवशी सबंतिधत अतिक्रमण धारकांना अतिक्रमण स्वत: हून काढून घेण्याबाबतची ‘वॉनिंग’ दिली होती. त्यानुसार काहींनी अतिक्रमण काढून घेतले. तर काहींनी काढलेच नव्हते. अशा अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला.
प्रांताधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनही रस्त्यावर
सोमवार, 30 डिसेंबर रोजी प्रांताधिकारी विनय गोसावी, नायब तहसीलदार राहूल वाघ, एसडीपीओ संदीप गावीत हे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत कालिका माता चौकात हजर झाले. तेथून महामार्गाच्या दोन्ही बाजुला पाहणी करत ते इच्छा देवी चौकापर्यंत आले. या रस्त्यासह रस्त्यालगत असलेले बांबूचे मंडप, लोटगाड्या, पान टपऱ्या, भाजी विक्रेत्यांच्या हात गाड्या अशी 15 अतिक्रमणे काढलीत.
टपऱ्यांसह हातगाडी जप्त करण्यात आल्या असून त्या त्वरीत ट्रॅक्टरव्दारे महापालिकेच्या मुख्य इमारतीत आणण्यात आले.
महामार्गाच्या पुलावर झोपडी
इच्छादेवी चौकापुढे असलेल्या स्वामी टॉवर समोर महामार्गाच्या पुलावर अतिक्रमण करून मोठी झोपडी उभारली होती. तीही या पथकाने निष्कासीत केली. ही झोपडी काढल्याने महामार्गाची हद्द स्पष्ट झाली.
यांचा कारवाईत सहभाग
या कारवाईत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड, अतिक्रमण निरीक्ष्ाक संजय ठाकूर, साजीद अली, संजय पाटील, सतीष ठाकरे, शेखर ठाकूर यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सहभाग होता