जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले ; उज्वला बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १ जानेवारी २०२६ : जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपले विजयाचे खाते उघडले असून . भाजपच्या माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड झाली आहे.

बुधवारी ३१ डिसेंबर रोजी महानगरपालिकेत उमेदवारी अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पार पडली. प्रभाग १२ ‘ब’ मध्ये भाजपच्या उज्वला बेंडाळे यांच्या विरोधात वैशाली निवृत्ती पाटील यांनी तीन अर्ज दाखल केले होते. मात्र, एकाच प्रभागात तीन अर्ज भरता येत नसल्याने आणि तांत्रिक मुद्द्यांवर त्यांचे ‘ब’ व ‘ड’ मधील अर्ज बाद ठरवण्यात आले.
तसेच, भाजपने त्यांना ‘एबी’ फॉर्म देखील दिलेला नव्हता. त्यामुळे या जागेवर उज्वला बेंडाळे या एकमेव उमेदवार राहील्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बुधवारी याबाबतची अधिकृत घोषणा करून त्यांची निवड बिनविरोध झाली.या निमित्ताने फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.







