ताज्या बातम्याजळगांव जिल्हामहाराष्ट्र
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ३१ जानेवारी २०२६ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे.
त्यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
मोजक्या निवडक नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राष्ट्रगीत आणि राज्यगीता नंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.





