नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले
शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द केले
लोकमाध्यम न्युज | जळगाव २४ ऑगस्ट २०२४ |
नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द केले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. सुरेश ( राजूमामा ) भोळे आ. संजय सावकारे,आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, संबंधित अधिकारी, उपस्थित होते.
दुर्देवी दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या व्यक्तींची नावे, आणि त्यांची गावे
प्रकाश नथ्थू कोळी (सुखडे), तळवेल. रोहिणी सुधाकर जावळे, वरणगाव. पल्लवी संदिप सरोदे, वरणगाव, अनिता अविनाश पाटील दर्यापूर. सरोज मनोज भिरुड, जळगाव/तळवेल, सुलभा पाडुरंग भारंबे, भुसावळ. गणेश पाडुरंग भारंबे, भुसावळ. मिनल गणेश भांरबे, भुसावळ. परी गणेश भारंबे, भुसावळ. विजया कडू जावळे, वरणगाव. निलिमा चंद्रकांत जावळे, वरणगाव. संदिप राजाराम सरोदे, वरणगाव. तुळशिराम बुधा तायडे, तळवेल. सुहास प्रभाकर राणे, तळवेल. निलिमा सुनिल धांडे, भुसावळ. भारती प्रकाश जावळे, वरणगाव, सागर तडु जावळे, वरणगाव. आशा समाधान बाविस्कर, तळवेल. सरला तुळशिराम तायडे, तळवेल. अनुप हेमराज सरोदे, सरला सुहास राणे, तळवेल. पंकज भागवत भंगाळे, वरणगाव. मंगला विलास राणे, तळवेल. रिंकु चंदना सुहास राणे, तळवेल. सुधाकर बळीराम जावळे, वरणगाव.