जळगांव जिल्हासामाजिकस्पोर्ट्स

मराठा प्रीमियर लीगचे १२ ते २२ फेब्रुवारी दरम्यान जळगाव येथे आयोजन

पुरुष आणि महिला ४२ संघातील ५५० स्पर्धकांचा सहभाग

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १२ फेब्रुवारी २०२६ : मराठा स्पोर्टस फाऊंडेशन जळगाव संचलित मराठा प्रिमियर लीग मेल्या ८ वर्ष पासून क्रिकेट लीग चे यशवी रित्या आयोजन करत असून यंदा ९ व्या पर्वत पदार्पण करत आहे. यावर्षी सुद्धा क्रिकेट प्रतीयोगिता स्पर्धा १२ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत सागर पार्क, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत ३६ पुरुष आणि महिलांचे ६ असे ४२ संघातील ५५० स्पर्धकांनी सहभाग नोंद‌विला असून.या स्पर्धेचे ११ दिवसांचे नियोजन व सविस्तर माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष राहुल पवार यांनी सविस्तर माहिती दिली.

पर्व-९ चे मुख्य प्रायोजक मुक्ताईनगर येथील योगराज कन्स्ट्रक्शन चे संचालक विनोद सोनख‌णे हे आहेत.

स्पर्धेचा मुख्य उद्देश फक्त क्रिकेट खेळापूर ता मर्यादित नसून समाज संघटन होऊन तरुणांनी व्यवसाया– भिमूख होऊन रोजगार निर्मिती करता येईल. त्यासोबतच सामाजिक मूल्ये जपत जपत रुग्णवाहिका, वैद्यकीय साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येते याला मिळणारा प्रतिसाद पाहता या वर्षी ‘शववाहिकेचे लोकार्पण या पर्वाच्या वेळी करण्यात येणार आहे.

मागील पर्वापासून दरवर्षीप्रमाणे वेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रमात यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जावई हरजीराजे महाडीक व छत्रपती संभाजी महाराज यांचे जावई शंकराजी महाडीक यांचे वंशज श्री. कृष्णाराजे महाडीक व स्वराज्याचे निष्ठावान श्रीमंत कान्होजी जेधे व बाजी सर्जेराव जेधे यांचे 14 वे वंशज श्री. रणधीर जेधे हे त्यांच्याकडील असलेला ऐतिहासिक व दुर्मिळ ठेवा जळगावकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत.असेही राहुल पवार यांनी सांगितले.

यावेळी  उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख,खजिनदार हर्षल पाटील,सचिव विजय मराठे,चेतन पवार, ईश्वर पाटील ,राहुल अकोलकर,आर के पाटील मराठा प्रीमियर लीग चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button