जळगांव जिल्हागुन्हे

नोकरीकाळात त्रास होईल अशी धमकी देऊन लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोकमाध्यम न्युज | जळगाव २६ सप्टेंबर २०२४ |

शैक्षणिक संस्थेत नोकरी टिकवायची असेल तर प्रत्येक शिपाईला १० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा नोकरीकाळात त्रास होईल अशी धमकी देऊन लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे नागरी एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कुल, पारोळा येथे २०११ पासून शिपाई पदावर कार्यरत आहे. संस्थेचे चेअरमन मिलींद मिसर यांचे भाऊ गौतम मिसर हे संस्थेच्या बॉईज हायस्कुलमध्ये उपशिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाली आहे. गौतम मिसर यांनी संस्थेत कार्यरत असलेल्या तक्रारदार यांच्यासह सर्व शिपायांना त्यांच्याकडे बोलावुन घेतले. त्या सर्वांना संस्थेच्या चेअरमन पदावर त्यांचे भाऊ मिलींद मिसर यांची नियुक्ती झाली आहे. संस्थेत नोकऱ्या टिकवायच्या असतील तर प्रत्येक शिपायास प्रत्येकी १० हजार रूपये जमा करावे लागतील. अन्यथा तुम्हाला नोकरीत त्रास होईल, असे सांगितले होते.

मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या मागणीप्रमाणे तकारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयाकडे ९ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार केली होती. तकारीची पडताळणी दरम्यान संशयित आरोपी मुख्याध्यापक मिसर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपये लाचेची मागणी करुन शाळेतील उपशिक्षक सचिन पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. तसेच १२ फेब्रुवारी रोजी सापळा रचून कार्यवाही दरम्यान मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी लाचेची रक्कम शाळेतील उपशिक्षक धर्मेंद्र शिरोडे यांच्याकडे देण्यास सांगितले. परंतु तक्रारदार यांना मुख्याध्यापक गौतम मिसर यांच्या सांगण्याप्रमाणे इतरांकडे लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने कार्यवाही स्थगित केली होती. मुख्याध्यापक गौतम मिसर यांनी तक्रारदार यांच्याकडे १० व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी १० हजार रूपये लाचेची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी व पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

 

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button