जळगांव जिल्हासामाजिकसांस्कृतिक

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली;१० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

| लोकमाध्यम न्युज जळगांव | २६ फेब्रुवारी २०२६ : जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे संस्थापक, श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी विविध प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठेभाऊ यांनी नेहमीच ‘अनुभूती’च्या विद्यार्थ्यांना ‘दादाजीं’च्या मायेचे छत्र आणि प्रेम दिले. याच आत्मीयतेच्या धाग्यातून अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांद्वारे ‘भक्ती संगीत संध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, अनुराधा बेरा, विक्रांत जाधव, शुभदा नेवे, निरज शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. ‘भाऊंच्या उद्यानात’ पार पडलेल्या या हृदयस्पर्शी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस भक्तीगीते सादर करून मोठ्याभाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. पांडुरंग नामी लागलासी ध्यास… या भक्तीगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. देवा इंद्रायणी थांबला…, तुझ मे राम मुझ मे राम…मुझमे राम तुझमे राम सबमे राम समाये…, शोधिसी मानवा राउळी मंदिरी…, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी…, माझे माहेर पंढरी… अशी एकापेक्षा एक सरस भक्तीगीत अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सादर केली.

या संगीत संध्येतून केवळ गायनच नव्हे, तर मोठेभाऊंच्या जीवनमूल्यांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमात देशाविषयीचा ममत्वभाव, पर्यावरणाविषयीची जागरूकता आणि मानवतेच्या नात्याने परस्परांविषयी आदर व आपुलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. तसेच, सामाजिक बांधिलकीतून एका संवेदनशील समाज निर्मितीसाठीचे योगदान या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. या स्वरमयी आदरांजलीने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button