जळगावसामाजिकसांस्कृतिक

महिलादिनानिमित्त सुरभि बहुुद्देशिय महिला मंडळातर्फे विविध स्पर्धा उत्साहात संपन्न 

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरभि बहुुद्देशिय महिला मंडळातर्फे नुकत्याच विविध स्पर्धा घेण्यात आल्या माजी महापौर सिमाताई भोळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.सुरवातीला सिमाताई भोळे, अध्यक्षा स्वाती कुळकर्णी , परीक्षक सुनीता नाईक, परीक्षक पद्मजा अत्रे, ह्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.प्रस्ताविक व सत्कार अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले.

प्रमुख पाहुण्या सिमाताई भोळे यांनी त्यांनी सुरभी च्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. व शासना तर्फे महिलांसाठी निघणाऱ्या योजनांच्या लाभ घेण्यास सांगितले, तसेच मंडळाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनाही दिले.

सुरभी तर्फे महिलादिनानिमित्त भारतीय विवाह संस्था: परंपरा आणि बदल ह्या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या मध्ये प्रथम – वैशाली ढेपे,द्वितीय – आसावरी जोशी,तृतीय – वैदेही, नाखरे,तसेच हिंदी/ मराठी नायिकेंच्या फँन्सी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या . त्यात प्रथम मंजुषा अडावदकर ( जयश्री गडकर),द्वितीय – सोनाली करमरकर( प्रियंका चोप्रा, काशीबाई), तृतीय -जागृती कुळकर्णी(गंगुबाई काठीयावाडी, आलिया भट),उत्तेजनार्थ 1- आसावरी जोशी ( निर्मिती सावंत ),उत्तेजनार्थ 2- अनुप्रिता बापट ( विद्या बालन ) दोन्ही स्पर्धांचे परीक्षक म्हणून सुनिता नाईक आणि पद्मजा अत्रे यांनी काम पाहिले.

ह्याच वेळी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 8 महिलांचा रोहिणी कुळकर्णी ( शैक्षणिक),डॉ श्रुती जोशी ( वैद्यकीय),अंजली हांडे ( कला, गायन क्षेत्र),रश्मी कुरमभट्टी ( धार्मिक ),योगिनी राव ( आर्थिक),निलिमा जोशी ( कायदेविषयक),वृषाली जोशी ( सामाजिक),दिपा देशपांडे ( साहित्य)तसेच बहुभाषिक महिला संघाच्या अध्यक्ष झाल्या बद्दल पूनम तिवारी ह्यांचाही ह्यावेळी सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन मानसी जोशी ह्यांनी केले. यावेळीअध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी 19 एप्रिलला भगवान श्री परशुराम जन्मोत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थितीत रहाण्याचे आवाहनही केले.

ह्यावेळी श्री सिद्धिविनायक महिला मंडळ, सुरभीचे सभासद व बहुभाषिक च्या माजी अध्यक्षा वृंदाताई भालेराव व वर्षा पाठक

आशा जोशी, निलिमा नाईक, अश्विनी जोशी, , पूनम जोशी, सुनीता सातपुते, स्मिता शुक्ल, मेघा नाईक, स्मिता बंगाली, रेवती शेंदुर्णीकर, सविता नाईक उपस्थित होत्या. कार्यक्रमास श्री सिद्धिविनायक मंदिर संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button