जिल्ह्यातील अल्पबचत व महिला प्रधान एजंट यांची कार्यकारिणी जाहीर….
जिल्हाध्यक्षपदी अनिल काळे यांची निवड
जळगांव दिनांक २७ : जळगाव जिल्ह्यातील सर्व अल्पबचत एजंट आणि महिला प्रधान एजंट यांच्या रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी पारीक पार्क उद्यान जळगाव, येथे झालेल्या विशेष सभेमध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ती पुढील प्रमाणे.
जिल्हाध्यक्ष- श्री.अनिल अवधूत काळे ,जिल्हा उपाध्यक्ष- सौ सरोज संजय कवीश्वर ,जिल्हा उपाध्यक्ष सविता कृष्णा बोंडे.सचिव-श्री रमेश पंढरीनाथ वाणी ,खजिनदार- कमलाकर मुरलीधर येवले ,सह खजिनदार- प्रवीण श्रावण चिनावलकर,कायदेशीर सल्लागार- प्रशांत देविदास भट
सदस्य- संदीप गणपत धांडे, आनंद कृष्णा केळकर ,प्रदीप रामचंद्र तिसा, किरण कुमावत, प्रिती योगेश पाटील,कल्पना सुनील कोळी,मीनाक्षी हेमचंद्र गुडवे,कल्पना सुरेश रडे ,नयना वाघुळदे,स्मिता अनंत वाटपाडे,सुधा अनिल जैन,छाया नामदेव वाणी, छाया राजेंद्र पाटील,शुभांगी रावेरकर,
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच असलास कार्ड, पेन्शन मागणीबाबत आणि सभासदांसाठी अपघाती विमा योजना यावर जिल्हाध्यक्ष अनिल काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. , आनंद केळकर यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी जिल्हयातील अल्पबचत एजंट आणि महिला प्रधान एजंट मोठया संख्येने उपस्थित होते.