लोकमाध्यम न्युज | जळगांव १० डिसेंबर २०२४
महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन,बृहन महाराष्ट्र योग परिषद, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका व छ.सं.न. योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीत संभाजी नगर येथे संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील महिला आणि पुरुषांच्या विविध वयोगटातील आणि योगासन अंतर्गत विविध प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या.
या विविध प्रकारापैकी ट्रॅडिशनल इव्हेंट
या प्रकारामध्ये ३६ ते ४५ सिनियर महिला या वयोगटात डॉ. शरयू विसपुते यांनी सहभाग नोंदविला आणि त्या प्रथम क्रमांकाच्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या.
पुढील बंगळुरू येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.
डॉ शरयु विसपुते या मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी च्या माजी विद्यार्थिनी असून त्यांना या स्पर्धेसाठी प्रा. पंकज खाजबागे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशा निमित्ताने के.सी.ई. सोसायटी जळगाव.चे अध्यक्ष.प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना.भारंबे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सोहम चे संचालक आणि आंतर विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. देवानंद सोनार, जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतीशजी मोहगावकर यांनी डॉ. शरयू विसपुते यांना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. डॉ. शरयू विसपुते पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी ११ डिसेंबर रोजी रवाना होणार आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मू.जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी ला दिली आहे. त्यांच्या या यशासाठी त्यांचे सर्व स्तरामधून कौतुक केले जात आहे.