जळगावसामाजिकसांस्कृतिक

बालरंगभूमी परिषद व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अरुश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने स्व.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : स्व. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘जीवनरंग विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे’ देखील आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा, अरुश्री हॉस्पिटल आणि मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर नुकतेच अरुश्री हॉस्पिटल येथे पार पडले.

रिंगरोडवरील अरुश्री हॉस्पिटलच्या डॉ.परिक्षीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.स्वाती बाविस्कर यांच्या विशेष सहकार्याने झालेल्या या आरोग्य तपासणी शिबिराला मुक्ती फाऊंडेशन जळगावचेही सहकार्य लाभले. उद्‌घाटन प्रसंगी नटराज पूजन करुन आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली. पूजन प्रसंगी अरुश्री हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.स्वाती बाविस्कर, मुक्ती फाऊंडेशनचे मकुंद गोसावी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष पंकज बारी, नेहा पवार – गुजराथी, कोषाध्यक्ष सचिन महाजन यांची उपस्थिती होती.

उद्‌घाटनानंतर डॉ.स्वाती बाविस्कर यांनी उपस्थित कलावंतांना आरोग्य विषयक व औषध घेतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

शिबिरात डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.हर्ष चौधरी, राहुल बनसोडे व अरुश्री हॉस्पिटलमधील आरोग्यसेवकांनी सहभागी कलावंतांच्या सीबीसी रक्त तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी आदी तपासण्या केल्या तसेच आवश्यक औषधांचे विनामूल्य वितरण केले.

या शिबिराचा शहरातील३८ कलावंतांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनोद ढगे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे दिपक महाजन, मोहित पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, दर्शन गुजराथी, राहुल पवार यांनी परिश्रम घेतले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button