जळगांव जिल्हागुन्हे

जिल्ह्यातुन २ गुन्हेगार हद्दपार

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव दि.२९ :  जिल्हयांत टोळीने गुन्हे करणारे इसमां विरुध्द हद्दपार प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कडेस आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडून चौकशी करुन ते खरोखर जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयी आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन हददपार करण्यात येत आहे.

चाळीसगांव शहर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. ०२/२०२३ प्रमाणे (१) जगदीश जगन्नाथ महाजन वय ५१ रा. नेताजी पालकर चौक चाळीसगांव टोळी प्रमुख, (२) दादु उर्फ विशाल जगदीश महाजन वय २३ रा. नेताजी पालकर चौक चाळीसगांव टोळी सदस्य, यांच्याविरुध्द जळगांव जिल्हयातील चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन ला खुन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी नोकरी हल्ला, घातक हत्यार बाळगणे गुंगीकारक अंमली पदार्थ, दंगल करणे असे एकुण १० गुन्हे दाखल आहेत. जगदीश महाजन,विशाल महाजन यांनी सदरचे गुन्हे टोळीने केलेले आहेत. सदर हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उपविभाग चाळीसगांव यांनी केलेली आहे.
जगदीश महाजन,विशाल महाजन हे टोळीने राहुन जळगाव जिल्ह्यातील चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन हददीत परीसरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. सदर टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे. सदरचा हद्दपार प्रस्ताव हा चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोहेकॉ विनोद भोई, पोना/ तुकाराम चव्हाण, पोना महेद्र पाटील, अशांनी प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे कडेस सादर केला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, यांनी प्रस्तावाचे चौकशी अंती जगदीश महाजन,विशाल महाजन यांना ०६ महिने करीता जळगाव जिल्हयांच्या हद्दीतुन हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखा,पो.निरीक्षक किसन नजनपाटील, यांनी पोलीस अंमलदार सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button