जळगांव जिल्हाक्राईम

आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; एलसीबीसह ६ पथकांची कारवाई

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २३ जानेवारी २०२५ |

प्रतिनिधी :- काळी हळद, पंधरा बिबा, दोन तोंडी साप, बनवत नोटा देण्याचे आमिष देऊन अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना मुक्ताईनगर , आणि बुलढाणा जिल्ह्यात घडल्या होत्या . याप्रकरणी गुन्हे दाखल असून या फरार संशयित आरोपीना पकडण्यासाठी मुक्ताईंआगर तालुक्यातील हलखेडा, मधापुरी गावांमध्ये पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा ,मुक्ताईनगर पोलीस आणि उपविभागीय पोलिसांच्या ६ पथकांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.

समिर हकिम पवार रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव , देश नरवीलाल पवार रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव,योगेश अंजुर पवार रा, हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव , निखील सवलत पवार रा, हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव , हकीम रफिक पवार रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव अशी अटक केलेल्या पाच संशयितांची नावे आहेत . या सर्व आरोपींवर मुक्ताईनगर,बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा , जळगाव जामोद या ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत .

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार , पोलिस अधिक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पो.स्टे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीत काळी हळद, पंधरा बिबा, दोन तोंडी साप, बनवत नोटा देण्याचे आमिषाने अनेक घटना घडल्या असून त्यबाबत गुन्हे दाखल असल्याने त्यातील आरोपी अटक करून अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार उप विभागीय पोलिस अधिकारी, राजकुमार शिंदे मुक्ताईनगर विभाग यांचे नेतृत्वात कु-हा दुरक्षेत्र अंतर्गत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरिक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकांनी हकीम पवार, समीर पवार,देश पवार ,योगेश अंजुर पवार,निखील सवलत पवार या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या .

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक, डॉ. श्री महेश्वर रेड्डी जळगाव यांचे आदेशानुसार अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनानुसार मा. उप विभागिय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे मुक्ताईनगर विभाग यांचे नेतृत्वात पोलिस निरिक्षक श्री बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, पोउपनि शरद बागल, पोउपनि गणेश वाघमारे, पोउपनि दत्तात्रय पोटे स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव स्टाप, पोलिस निरिक्षक नागेश मोहिते मुक्ताईनगर पोलिस स्टेशन व पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, तसेच कु-हा दुरक्षेत्राचे सफौ संतोष चौधरी, सफौ/ अश्पाक शेख, पोहेकाँ संजय पवार, पोना मोतीलाल बोरसे, पोना प्रदिप इंगळे, पोना संदिप वानखेडे ,अनिल देवरे रविंद्र धनगर, प्रशांत चौधरी, गोविंद सुरवाडे, गोविंदा पवार, सागर सावे, सुनिल मोरे, प्रविण जाधव, अंकुश बाविस्कर मपोअश्विनी बोदडे, तसेच क्यु.आर.टी पथक यांनी केली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button