जळगांव जिल्हामहाराष्ट्रशासकीय

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास येणार गती; चिंचोली-नशिराबाद-उमाळा रस्ता व पुलाच्या कामासाठी 6 कोटी 60 लाख निधी मंजूर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा फळास

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ११ फेब्रुवारी २०२५ |

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारासाठी मोठी पुढची वाट मोकळी झाली आहे. धावपट्टीची लांबी वाढवण्यास अडथळा ठरणाऱ्या नशिराबाद-उमाळे प्रतिमा 18 हा रस्ता बंद करून त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग 109 चे साखळी क्रमांक 13 /00 ते 18/00 कि.मी. दरम्यान रुंदीकरण करणे , चिंचोली ते नशिराबाद उमाळा रस्त्यापर्यंतचा वहिवाट रस्ता देणे व वहिवाट रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधकामासाठी 6 कोटी 60 लाख 70 हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय व विधी मान्यता देऊन सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 5 जुलै 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार एकूण 10 कोटी निधीची मागणी करण्यात आली होती. शक्तीप्रदत्त समितीने 14 जानेवारी 2025 रोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने हा निधी मंजूर केला आहे.

धावपट्टी विस्ताराच्या कामांमुळे जळगाव जिल्ह्यातील विमानसेवा अधिक सक्षम होणार असून, औद्योगिक विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
पुढील काही महिन्यांत या कामांची गती वाढवली जाणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा फळास, शेतकऱ्यांचे आभार

सध्या जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुणे या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. या विस्तारीकरणामुळे विमानसेवा अधिक सक्षम होणार असून शेतीमालाच्या कार्गो वाहतुकीस गती मिळणार असल्याने व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. नशिराबाद व चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय केवळ विमानतळाच्या विस्तारासाठी नव्हे, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयींसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. आता मंजूर निधीच्या अनुषंगाने विस्तारीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात येणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button