जळगांव जिल्हासामाजिक

लेवा पाटीदार समाज भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ९ मार्च २०२५ |

लेवा एज्युकेशनल युनियन जळगाव व अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाबाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे दिनांक 23 मार्च 2025 वार रविवार रोजी स्टँडर्ड टाईम. वैदिक पद्धतीने लेवा बोर्डिंग हॉल जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.

सामूहिक विवाह सोहळा घेण्यासंदर्भात बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत महासंघाचे पदाधिकारी व बहिणाई ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या अखिल भारतीय लेवापाटीदार युवक संघाचे केंद्रीय अध्यक्ष- ॲड..प्रकाशराव व्ही.पाटील, प्रदेशाध्यक्ष – प्रदीप (बंडू )भोळे,मधुकर भंगाळे, निखिल रडे, अविनाश भोळे, सुरेश फालक. तसेच ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा – आशाताई कोल्हे, प्रदेश उपाध्यक्षा हर्षाताई बोरोले , जिल्हा जिल्हा अध्यक्षा – सुनीता येवले, महानगराध्यक्ष- वैशाली झोपे, डॉ.डिंपल पाटील प्रा.वंदना नेमाडे , अंजली नारखेडे, भावना भोळे यांची उपस्थिती होती.

समाजामध्ये विवाह सोहळ्याचे खर्चाचे प्रमाण वाढले आहे. संस्कार व सांस्कृतिक बाह्यप्रथा जसे तसेच प्री-वेडिंग, संगीत, मेहंदी, विवाह दोन वेळेस लावणे तसेच संगीत व मेहंदी सोहळा केवळ हौस म्हणून केला जातो. त्यामुळे विवाह सोहळ्यात समाजबांधवांचा अमाप खर्च होतो त्यामुळे सामाजिक व कौटुंबिक समस्या होऊ लागल्या आहेत वैदिक पद्धत व पारंपारिक पद्धत असे दोन प्रकारे विवाह लावले जातात. यामुळे पाहुणे मंडळींना व समाज बांधवांना विनाकारण वेठीस धरले जाते ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाही. या प्रकाराला आळा बसावा व समाज प्रबोधन व्हावे म्हणून सामूह सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या समाजबांधवांकडे आपल्या मुला मुलींचे लग्न ठरलेले असतील अशा समाजबांधवांनी दिनांक 13 मार्च 2025 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न हे विनामूल्य लावण्यात येणार असून विवाहित जोडप्यांना संसारपयोगी व भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे.

समाज बांधवांनी खालील ठिकाणी संपर्क साधावा…
जळगाव पूर्व विभाग – ॲड. प्रकाशराव व्ही.पाटील केंद्रीय अध्यक्ष अ. भा. लेवापाटीदार युवक महासंघ मो.-9373400011
जळगाव पश्चिम विभाग प्रदीप (बंडू) भोळे प्रदेशाध्यक्ष – अ. भा लेवापाटीदार युवक महासंघ
मो. -75 88054347

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button