जळगांव जिल्हाकृषी

रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात १० रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

९ ते १५ ऑगस्ट दरम्यान तालुकास्तरावर रानभाजी सप्ताहाचे आयोजन

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.६ ऑगस्ट २०२५ : जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रोटरी क्लब ऑफ वेस्ट, मायादेवी नगर, जळगाव येथे होणार आहे.

या महोत्सवाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

सकस अन्नामध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचा समावेश अत्यंत उपयुक्त असतो. या रानभाज्यांमध्ये जीवनसत्वे, खनिजे, औषधी घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यावर कोणतेही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारले जात नसल्यामुळे त्या आरोग्यास अधिक लाभदायक ठरतात.

या महोत्सवामध्ये करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा, तरोटा, फांग यांसारख्या पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन व थेट विक्री होणार आहे. तसेच, रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध खाद्यपदार्थही चवीनिशी उपलब्ध असतील.

या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तालुका स्तरावर रानभाजी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचा तपशील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाजी महोत्सवास भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button