जळगांव जिल्हाराजकिय

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते भव्य गुलाब पुष्पहाराने स्वागत !

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते ना. गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांचे जळगाव शहरात प्रथम आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने प्रचंड उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.

जळगाव रेल्वे स्थानक परिसरात स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गिरीश भाऊंचे आगमन होताच घोषणांनी परिसर दणाणला. कार्यकर्त्यांचा उत्साह, पुष्पवृष्टी आणि जल्लोषामुळे रेल्वे स्थानक परिसर अक्षरशः उत्सवस्थळ बनला होता.

यावेळी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गिरीश भाऊ महाजन यांना भव्य गुलाबपुष्प हार घालून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.

जळगाव जिल्ह्याच्या राजकीय आणि विकासात्मक वाटचालीत गिरीश भाऊ महाजन यांचे नेतृत्व सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. जळगाव जिल्ह्यासोबतच आता नाशिकसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. “गिरीश भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी भाजप पश्चिम महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक ॲड. शुचिता हाडा, अरविंद देशमुख, सुरेखा तायडे, गायत्री राणे, विशाल भोळे, राजेंद्र घुगे पाटील, महानगर सचिव विशाल त्रिपाठी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जळगावात झालेल्या या भव्य स्वागताने गिरीश भाऊ महाजन यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button