जळगांव जिल्हाभारतमहाराष्ट्र

वीर जवान अमर रहेच्या घोषणा देत, शहीद स्वप्नील सोनवणे यांना अखेरचा सलाम

भडगाव तालुक्यातील गुढे गाव शोकाकुल

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.१२ ऑगस्ट २०२५ :५७ वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल (जी.डी.) स्वप्निल सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू नंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे (ता. भडगाव) येथे सैनिकी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. “वीर जवान अमर रहे” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंच्या धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला.

९ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीओपी ढोलागुरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्त करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले होते. तातडीने त्यांना बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळी 10 वाजता पार्थिवावर पूर्ण सैनिकी सन्मानाने अंतिम विधी पार पडले. यावेळी तहसीलदार शितल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, 57 बटालियन बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, सुमित पाटील, माजी सभापती विकास  पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, माजी जि.प. सदस्य संजय श्रावण पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान  पाटील, युवा नेते हर्षल पाटील, शिवदास पाटील, माझ्या सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष, सचिव व माजी सैनिक बापू पाटील, गुढे गावच्या सरपंच कल्पनाताई उत्तमराव महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोहन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

—–

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button