प्रति पंढरपूर विठ्ठल संत महाराज नामदेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न आमदार राजु मामा भोळे यांची पाच लाखाची देणगी
नामदेव महाराजांचे १६ वे वंशज श्रीगुरु मुकुंद नामदास महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न
लोकमाध्यम न्युज | जळगाव १९ सप्टेंबर २०२४ |
श्री विठ्ठल नामाच्या गजरात श्री विठ्ठल नामदेव प्रति पंढरपूर मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिनांक.१६ रोजी संपन्न झाला. मन्यारखेडा गट नंबर 446 प्लॉट नंबर 30 येथे संत नामदेव महाराज बहुउदेशिय संस्था च्या नियोजित श्री विठ्ठल संत नामदेव महाराज प्रती पंढरपूर मंदिराचा भूमिपूजन सोहळा नामदेव महाराजांचे १६ वे वंशज श्रीगुरु मुकुंद नामदास महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. अतिशय नयनरम्य अशा जागेवर संस्थेच्या स्वमालकीच्या प्लॉट मिळकतीत हा कार्यक्रम साकारण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम भूमिपूजन स्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष कुसुम बिरारी व शरद बिरारी यांनी सपत्नीक हस्ते पूजा केली तसेच कुदळ मारून भूमिपूजन ह. भ. प. मुकुंद महाराज नामदास व मुरारी महाराज व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.संस्थेच्या स्व मालकीच्या जागेत 35 फूट उंच मंदिर मन्यारखेडा या शिवारात उभारण्यात येत असून लवकरच जागा विस्तार करण्याचा संस्थेचा मानस देखील या प्रसंगी बोलण्यात आला या जागेत सुमारे अर्धा कोटी रुपये खर्चून मंदिर साकारण्यात येत असल्याचे कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी सांगितले.
मन्यारखेडा आता धार्मिक हब बनत आहेत
यानंतर शहराचे आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते संस्थेच्या जागेवर भूमिपूजन व फलकाचे अनावरण करण्यात आले.या प्रसंगी समाजातील दानशूर दात्यांनी मोठ्या स्वरूपात देणग्या जाहीर केल्या. कार्यक्रमास माजी महापौर सीमाताई भोळे अ भा शिंपी समाज राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, विश्वस्त श्री पी. टी. शिंपी दिलीप भांडारकर जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, युवक अध्यक्ष तुषार शिंपी ,संस्था अध्यक्ष सतीश पवार, समाज जळगाव अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, वंदना भांडारकर, नगरसेवक अमित काळे, प्रवीण कोल्हे, मन्यारखेडा ग्राम पंचायत सदस्य, नामदेवराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य सचिव मनोज भांडारकर यांनी केले. संस्था गेल्या 18 वर्षापासून सामाजिक जनहितार्थ कार्यरत आहे संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा त्यांनी आपल्या मनोगतातून मांडला. अध्यात्मिक क्षेत्रात हे मोठे पाऊल टाकत असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. मुकुंद नामदास महाराजांनी संस्थेच्या प्रगतीचा उल्लेख करतांना महाराष्ट्रातील हे एक आगळे वेगळे असे प्रति पंढरपूर मंदिर तयार होतअसल्या बद्दल आनंद व्यक्त केला. यासाठी जळगाव नगरी व समाज बांधव भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या आगामी उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या. नामदेव महाराजांनी ज्या प्रकारे सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्य केले त्याच पद्धतीने हे कार्य होत असल्याचे नमूद केले. मोकळ्या जागेवर सर्वांसाठी संत उद्यान साकारण्यात यावे व यासाठी मन्यारखेडा ग्रामपंचायतचे सदस्य नामदेवराव पाटील व त्याचे सरकारी यांनी संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन केले. एक चांगला उपक्रम या माध्यमातून होईलच व मन्यारखेडा गावाचा सुद्धा विकास या अनुषंगाने होईल असे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
त्यानंतर आ राजू मामा भोळे यांनी भूमिपूजन प्रसंगी सांगितले की नामदेव महाराजांचे कार्य महान असून पंढरपूर ते गुमान पर्यंत त्यांनी भागवत धर्माचा भगवा पताका नेला असून त्यांच्या या कार्याचे कौतुक संपूर्ण विश्वभर सर्वांना माहीत आहे. संत नामदेव महाराजांनी केलेल्या कार्यामुळेच आज आपण भाग्यवान आहोत की त्यांचे वंशज या ठिकाणी भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहिले. आपण सर्वजण धन्य झालो असे राजू मामांनी सांगितले व मंदिरासाठी स्वता पाच लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे ह भ प भागवत,प्रभाकर, जितू ,निवृत्ती, भिकाजी महाराज कुमारी तेजश्रीताई महाराज यांची विषेश उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या उपाध्यक्ष कुसुम बिरारी सचिव मनोज भांडारकर कोषाध्यक्ष चेतन खैरनार ,सदस्य प्रमोद शिंपी,गणेश सोनवणे, किरण सोनवणे,भाग्यश्री जगताप गिता जगताप, डॉ चेतन खैरनार,अरुण मेटकर रवींद्र जगताप दिलीप सोनवणे, महेश शिंपी, विवेक जगताप, शरद सोनवणे प्रमोद निकुंभ, शरदराव बिरारी, अनिल खैरनार, संभाजी शिंपी, नथू शिंपी, जितेंद्र शिंपी, अशोक शिंपी, राकेश जगताप, जितेंद्र शिंपी, रेखाताई, विद्याताई, सुनिल निकुंभ यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश शिंपी व मनोज भांडारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन खैरनार यांनी केले.