जळगांव जिल्हापोलीस

राष्ट्रीय एकता परेडसाठी जळगाव पोलीस दलातील कॉन्स्टेबल सागर सोनार यांची निवड

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २९ ऑक्टोंबर २०२५ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) येथे आयोजित राष्ट्रीय एकता दिवस परेडसाठी देशभरातील निमलष्करी दल आणि विविध राज्यांच्या पोलीस दलांचा सहभाग असणार आहे. या भव्य परेडचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

या परेडसाठी महाराष्ट्र पोलीस वाद्यवृंद पथकात जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालयात कार्यरत कॉन्स्टेबल श्री. सागर अशोक सोनार यांची विशेष निवड झाली आहे. ते महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करीत परेडमध्ये सहभागी होतील.

2014 बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल असलेले सागर सोनार यांनी यापूर्वी अनेक राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रतिनिधित्व केले असून, जळगाव पोलीस संघासाठी पदकेही मिळवली आहेत.

या निवडीसाठी श्री. सोनार यांना जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते , पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. आव्हाड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन चिवंडे तसेच जळगाव जिल्हा वाद्यवृंद पथक प्रमुख सलीम खान यांचे मार्गदर्शन मिळाले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button