जळगांव जिल्हाक्राईममहानगर

नामांकित सुवर्णपेढ्यांना ‘लेडी स्नॅचर’चा गंडा; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

अर्ध्या तासात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी; सीसीटीव्हीत आरोपी महिला कैद

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ७ नोव्हेंबर : शहरातील सुवर्णपेढ्यांतून एका अज्ञात ‘लेडी स्नॅचर’ने केवळ अर्ध्या तासात साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. हातचलाखी आणि गुंतागुंतीच्या युक्त्या वापरत या महिलेने शहरातील तीन नामांकित सुवर्णपेढ्यांना गंडा घातला असून, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुभाष चौकातील आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली महिला अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने आली. सेल्समनचे लक्ष विचलीत करून तिने १ लाख ८५ हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या आणि नकली अंगठ्या ट्रेमध्ये ठेवल्या.

यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तीच महिला भंगाळे गोल्ड ज्वेलर्समध्ये गेली आणि त्याच पद्धतीने १ लाख ४५ हजार रुपयांची अंगठी चोरून नेली.

दरम्यान, जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ६ ते ७ दरम्यान तिने आणखी पी.एन.गाडगीळ सुवर्णपेढीत १ लाख ४० हजार रुपयांची अंगठी लंपास केली. तिन्ही घटनांमध्ये एकाच महिलेचा सहभाग असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असून, पोलिसांनी तिच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे. सदरची महिला मध्य प्रदेशातील असल्याचे कळते. शनिपेठ पोलिस ठाण्यातील तपास पोहेकॉम प्रदीप नन्नवरे करीत आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button