जळगांव जिल्हामहाराष्ट्र

“स्मिताताईंनी केंद्र सरकारची सर्व खाती एका छताखाली आणली”- मंत्री संजय सावकारे यांचे गौरवोद्गार

‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ प्रदर्शनाची उत्साहात सांगता  

| जळगाव 😐 लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ८ नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या देश आणि राज्याच्या विकास प्रवासाचे प्रतिबिंब दाखवणारे ‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ हे भव्य प्रदर्शन जळगावातील शिवतीर्थ मैदानावर भव्यदिव्य वातावरणात पार पडले. खासदार स्मिता वाघ यांच्या पुढाकाराने आयोजित या प्रदर्शनाने जळगावकरांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी दिली.तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यात महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “या प्रदर्शनाद्वारे स्मिताताईंनी केंद्र सरकारची सर्व खाती एका छताखाली आणली आहेत. शासनाच्या विकास योजनांचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना मिळवून देण्याचे हे माध्यम ठरले,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

या वेळी आमदार राजूमामा भोळे, भाजपा संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ, गोदावरी शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा केतकी पाटील, माजी जि.प. सदस्य राकेश पाटील, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, अजित राणे, एलडीएम सुनील डोहरे तसेच फ्रेंड्ज एक्झिबिशनचे प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, विभागीय प्रमुख दत्ता थोरे आणि दीपकसिंग मेहता उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, “या तीन दिवसांच्या प्रदर्शनात अधिकारी आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचे आदर्श उदाहरण घडले. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचली. हे प्रदर्शन म्हणजे विकास आणि जनसंपर्क यांचा सुंदर संगम होता.” या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, शाळा-काॅलेजचे विद्यार्थी, सरपंच-उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तीन दिवसांत तब्बल १२ हजारांहून अधिक जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

प्रदर्शनातील सर्वोत्तम शासकीय स्टॉल्सना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सशस्त्र दलांसाठी मुनिशन्स इंडिया लिमिटेड, डिजिटल इनोव्हेशनमध्ये गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये भारतीय रेल्वे, बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक ऑफ इंडिया तर पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी फलोत्पादन आणि वृक्षारोपण कॉर्पोरेशन विभाग – तमिळनाडू या विभागांना पुरस्कार देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्प स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या “ऑल इन वन रोबोटिक किट” प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला, केसीई अभियांत्रिकी कॉलेजला “मशीन पॉवर्ड बाय सोलर एनर्जी” प्रकल्पासाठी द्वितीय, तर पोदार इंटरनॅशनल स्कूलला “थ्रेट ऑफ ह्युमॅनिटी” या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांक मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले, सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपकसिंग मेहता यांनी मानले.

‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगावकरांनी विकासाच्या झंझावाती प्रवासाचे साक्षीदार होत शासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचे नवे दालन खुलं झालं.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button