जळगावकृषीमहाराष्ट्र

राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या संशोधन समितीवर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डाॅ.के.बी.पाटील यांची निवड

लोकमाध्यम न्युज जळगांव दि . २२ : (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा केळीच्या संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी अभिनंदन केले.

डॉ. के.बी. पाटील यांचा केळी पिकाचा दीर्घ अनुभव

डॉ . के. बी. पाटील हे गेल्या तीस वर्षापासून केळी पिकाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. केळी उत्पादन तंत्रज्ञानावर अनेक प्रकारचे संशोधन करून जैन टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळी पिकात क्रांती केली आहे. केळीची काढणी पूर्व व काढणी पश्चात हाताळणी आणि निर्यात यासाठी तीस वर्षे काम करून केळीची निर्यात वाढविली. केळीसाठी गादी वाफा, मल्चिंग, फाॅस्फोरीक ॲसिडचा वापर, वर्षभर केळीसाठी फर्टिगेशनचे तंत्रज्ञान केळीसाठी २०० ग्रॅम नत्र, ७० ग्रॅम स्फूरद व ४०० ग्रॅम पालाश प्रति झाड, फ्रुट केअर पद्धती असे अनेक तंत्रज्ञान देशात त्यांनी प्रथमच विकसीत केले. जैन टिश्यूकल्चर ग्रॅडनैन या विदेशी जातीला संपूर्ण देशात लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जगातील सर्व प्रमुख केळी उत्पादक देशांना भेटी दिलेल्या असून त्यांचा सखोल अभ्यास झालेला आहे. केळीबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. केळी पिकाचा प्रचंड अभ्यास व अनुभव अधोरेखीत करत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी डाॅ. के.बी. पाटील यांची संशोधन सल्लागार समितीवर निवड केली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button