जळगावजळगांव जिल्हामहाराष्ट्र

जळगावात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. २ फेब्रुवारी २०२६ : राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी स्व. अजित पवार यांच्यासोबत काम करतांना आलेले अनुभव आणि त्यांच्या कार्याची पद्धत आदी आठवणींना पालकमंत्र्यानी उजाळा दिला. 

सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाला जळगावकर सर्वसामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित दादा अमर रहेच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन ,पालकमंत्री गुलाबराव पाटील ,सेवानिवृत्त अभियंता व्ही.डी . पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, शिवसेनाप्रमुख विष्णू भंगाळे , ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी स्व. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, उद्योजक श्रीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे,भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी,मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे , भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, पीपल पब्लिकन पार्टीचे राजू भाई मोरे, इकरा संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश देसले , ,नगरसेवक अरविंद देशमुख, उज्वला बेंडाळे, ह भ प जळकेकर महाराज,प्रफुल्ल देवकर, अमित पाटील,,माजी अभियंता व्ही डी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर कार्याध्यक्ष नदीम मलिक, माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, यांच्यासह जळगावकर सर्वसामान्य नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सर्वपक्षीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव लोकसभा अध्यक्ष संजय पवार यांनी तर सूत्रसंचालन ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी केले .

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button