जळगांव जिल्हासहकार

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – श्री महावीर सहकारी बँक लि. च्या नवीपेठमधील मुख्यालयात रिक्त झालेल्या संचालकपदासाठी २६ एप्रिल ला पोटनिवडणूक घेण्यात आली. श्री महावीर सहकारी बँकच्या संचालक मंडळातील उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख यांचे निधन झाल्यामुळे व श्वेता चोरडिया यांनी पदत्याग केल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगावचे सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पाहिले. सभेचा कोरम पुर्ण झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम पत्रिकानुसार नामनिर्देशन पत्र विक्री करण्यात आले. नानासाहेब देशमुख यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सर्वसाधारण मतदार गटातुन स्वरूपकुमार भागचंद लुंकड व महिला मतदार गटातुन रंजना जितेंद्र देशमुख यांचे एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. अध्यासी अधिकारी डी. व्ही. पाटील यांनी दोघं जागांसाठी एकमेव वैध नामनिर्देशन पत्र असल्याने स्वरूपकुमार भागचंद लुंकड व रंजना जितेंद्र देशमुख यांची अविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.

या निवडीबद्दल बँकेचे अध्यक्ष दलीचंदजी हस्तीमल जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, बँकेचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र मयूर, माजी महापौर प्रदीप रायसोनी, जेडीसीसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र नानासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले. याप्रसंगी बॅंकेचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, सुभाष लोढा, अशोक खिवसरा, जितेंद्र कोठारी, गुणवंत टोंगळे, रविंद्र गुजराथी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, भास्कर कोळी, आर. जे. पवार, कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर आदी संचालक व सीईओ मनोहर पाटील उपस्थित होते. यावेळी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांनी मनोगत व्यक्त करुन संधी दिल्याबद्दल दलिचंदजी जैन, सुरेशदादा जैन, अशोक जैन व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. पोट निवडणूक प्रक्रिये संबंधित मोलाचे मार्गदर्शन केल्याने डी. व्ही. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार बँकेतर्फे अध्यक्ष दलीचंदजी जैन यांनी मानले.

ग्राहकांशी संवाद महत्त्वाचा- दलिचंदजी जैन

नवनियुक्त संचालकांनी बँकेच्या सर्व शाखांमध्ये नियमित भेटी द्याव्यात. कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधून ग्राहकांना जास्तीत जास्त सेवासुविधा देता येतील यासाठी नवकल्पना सुचवाव्यात, ग्राहक व बँकेच्या हिताचा समन्वय वाढवूून बँकेच्या उत्कर्ष साधावा, असे मोलाचे मार्गदर्शन दलिचंदजी जैन यांनी यावेळी केले. श्री महावीर सहकारी बँकेच्या नवीन संचालकांसोबत (डावीकडून) अजेय राखेचा, श्रेयस कुमट, जितेंद्र कोठारी, सुभाष लोढा, डी. व्ही. पाटील, स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख, दलिचंदजी जैन, सागर पगारिया, शांतीलाल बिनायक्या, गुणवंत टोंगळे, भास्कर कोळी, रविंद्र गुजराथी.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button