जळगांव जिल्हामहाराष्ट्र

जळगांव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पुन्हा गुलाबराव पाटील; ना.गिरीश महाजन नाशिकचे तर संजय सावकारे भंडाऱ्याचे पालक मंत्री

ना.गुलाबराव पाटलांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हॅट्ट्रिक

लोकमाध्यम न्युज | जळगांव १८ जानेवारी २०२५ |

मुंबई वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिना लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून, या यादीमध्ये उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

या प्रमुख नेत्यांबरोबरच नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्रिपद, वाशिमचं पालकमंत्रिपद हसन मुश्रिफ यांच्याकडे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. सांगलीचं पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर पालघरचं पालकमंत्रिपद गणेश नाईक यांच्याकडे आणि जळगावचं पालकमंत्रिपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे
– देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
– एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
– अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
– चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
– राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
– हसन मुश्रिफ – वाशिम
– चंद्रकांत पाटील – सांगली
– गिरीश महाजन – नाशिक
– गणेश नाईक – पालघर
– गुलाबराव पाटील – जळगाव
– संजय राठोड – यवतमाळ
– आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) – मुंबई उपनगर
– उदय सामंत – रत्नागिरी
– जयकुमार रावल – धुळे
– पंकजा मुंडे – जालना
– अतुल सावे – नांदेड
– अशोक उईके – चंद्रपूर
– शंभुराज देसाई – सातारा
– अदिती तटकरे – रायगड
– शिवेंद्रराजे भोसले – लातूर
– माणिकराव कोकाटे – नंदूरबार
– जयकुमार गोरे – सोलापूर
– नरहरी झिरवळ – हिंगोली
– संजय सावकारे – भंडारा
– संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
– प्रताप सरनाईक – धाराशिव
– मकरंद जाधव – बुलढाणा
– नितेश राणे – सिंधुदुर्ग
– आकाश फुंडकर – अकोला
– बाबासाहेब पाटील – गोंदिया
– प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) – कोल्हापूर
– आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
– पंकज भोयर – वर्धा
– मेघना बोर्डीकर – परभणी

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button