जळगांव जिल्हाविधान परिषद निवडणूक

जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे नंदकिशोर महाजन सर्वाधिक मतांनी विजयी

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी ) दि. २२ –  महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन सर्वाधिक मतांनी विजयी झाले.

या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी  एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे शरद शामराव यांना १७ मते, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते तर रेश्मा कुंदन काळे यांना १ मत मिळाले. याशिवाय ५ मते अवैध ठरली.

मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर श्री. महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली.

मतमोजणीनंतर मा. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विजयी उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, डॉ .राधेश्याम चौधरी, दिपक सुर्यवंशी ,पितांबर भावसार तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button