जळगांव जिल्हाशासकीय

राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २३ मार्च २०२५

( जिमाका वृत्तसेवा ) जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायालयातील प्रलंबित व दाखलपूर्व मिळून एकूण ११,०८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ३१,५५,७६,९३९/- रुपयांची वसुली करण्यात आली.

या लोक अदालतीमध्ये ९,२७६ दाखलपूर्व आणि १,८०५ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच १९ ते २१ मार्च दरम्यान झालेल्या विशेष मोहिमेत आणखी ६८१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

मा. श्री. एस. एन. राजुरकर, प्र. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा न्यायाधीश-१ जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत यशस्वी झाली. सर्व न्यायाधीश, वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांच्या सहकार्याने या उपक्रमाला मोठे यश लाभले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button