जळगावआरोग्यमहानगर

बालकांना पोलिओ डोस देण्याचे आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत, जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागातर्फे आज २८ रोजी शहरात पल्स पोलिओ मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लहान बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला.

आमदार राजूमामा भोळे यांनी, “बाळ आणि बाळंत माता यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन या प्रसंगी केले. महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, जळगाव शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ डोस देऊन, त्यांना भविष्यातील संभाव्य अपंगत्वापासून (पोलिओ) वाचवावे, असे आवाहन केले. तसेच ३० जूनपासून शहरात घरोघरी जाऊन हे लसीकरण केले जाईल. त्यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी माहितीही त्यांनी दिली.या प्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे आणि नगरसेवक दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. तसेच वैद्यकीय व आरोग्य यंत्रणेतील राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे आणि इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button