लोकमाध्यम न्युज | जळगांव १२ जानेवारी २०२५ |
मुंबई येथे नुकताच अ. भा. संत नामदेव महाराज क्षत्रिय एक संघाची स्थापना करण्यात आली. याच प्रसंगी जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश भोळे यांचा सत्कार संत नामदेव महाराजांचे १६ व१७ वे वंशज ह भ प मुकुंद महाराज ह भ प ज्ञानेश्वर व निवृत्ती नामदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात प्रचंड मताधिक्याने मामा निवडून आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथे जुलै२०२५ मधे संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून त्यांचे आमंत्रणही याप्रसंगी दिले. या प्रसंगी आ सुरेश भोळे यांनी सांगितले की संत नामदेव महाराज हे आमचे आदर्श स्थान असून जळगाव शहरातील व महाराष्ट्रामध्ये समस्त शिंपी समाज बांधवांनी भारतीय जनता पार्टी व महायुतीला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले व सहकार्य केले. त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केले व समाजाच्या ज्याही काही मागण्या असतील त्या विषयी मी तत्परतेने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या प्रसंगी अँड महेश ढवळे, ज्येष्ठविधी तज्ञ अजय तल्हार, सामाजिक कार्यकर्ते मनोज भांडारकर हे उपस्थित होते.