जळगावअध्यात्मिकसांस्कृतिक

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानच्या श्री संत मुक्ताबाई रामपालखी आणि दीड शतकी पंढरपूरकडे पायीवारी निघाली. जळगाव ते पंढरपूर पायीवारीचे वारीचे स्वागत जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ करण्यात आले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. तर जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा यांनी पालखीचे पूजन आणि वारकरींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भिमराव दांडगे, किशोर पाटील यांनी श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांची सेवा केली. 

जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या श्रीराम पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता दर वर्षी करण्यात येत असते, हे वाहन वारकऱ्यांसोबतच पंढरपूर येथे जात असते. या पालखीची स्थापना १७९४ मध्ये झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातिथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते. यावेळी ह.भ.प. श्रीराम महाराज यांच्यासह शेकडो वारकऱ्यांसोबत पालखीचे पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले.

जैन हिल्सच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ जी. आर. पाटील, मनोहर बागुल, सुनील खैरनार, अभिजीत शुक्ला, नितीन चोपडा, श्रेयेस कुमट यांच्यासह श्रीराम मंदीर संस्थचे विश्वस्त मंडळी उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांना अल्पोहार वाटप करण्यात आले. दिंडीच्या स्वागतासाठी जैन इरिगेशनच्या मानव संसाधन विभाग, सुरक्षा विभाग, राजभोज खानपान विभागातील सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

संत मुक्ताबाईंच्या श्रीराम पालखीचे जैन हिल्सच्या गेटवर पादुकांचे दर्शन घेताना (इनसेटमध्ये) सौ. निशा जैन, वारीमध्ये सहभागी ह.भ.प मंगेश महाराज, श्रीराम महाराज व वारकरी.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button