जळगावमहानगरसामाजिक

पत्रकारितेची आणि छायाचित्रणाची नैतिक मूल्ये जपणे अत्यंत आवश्यक : पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे

वृत्तपत्र छायाचित्रकार हे समाजाचे डोळे : महापौर दीपमाला काळे

वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा गौरव; मलाबार गोल्ड अन् प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचा उपक्रम !

| लोकमाध्यम न्युज | जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्रण दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) मलाबार गोल्ड अँड डायमंड्स आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ तसेच सर्व वृत्तपत्र व डिजिटल मीडिया छायाचित्रकारांचा स्नेहमयी वातावरणात भव्य सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि कॅमेरा पूजनाने झाली. याच औचित्याने मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नवीन डायमंड दागिन्यांचे लॉन्चिंगही करण्यात आले.

व्यासपीठावर शहराच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्टोअर मॅनेजर प्रियंका पाटील, सुजित नायर आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधीपाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

“छायाचित्रकार हे समाजाचे डोळे” – महापौर दीपमाला काळे
आपले मनोगत व्यक्त करताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “छायाचित्रकार हे समाजाचे डोळे आहेत. समाजात घडणारे सत्य आणि वास्तव आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचे अत्यंत जबाबदारीचे व महत्त्वपूर्ण कार्य तुम्ही करत आहात.”

फोटोग्राफीमध्ये ‘एथिक्स’ महत्त्वाचे – एसपी श्रीकांत धिवरे
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या भाषणात स्वतःच्या फोटोग्राफीच्या आवडीला उजाळा दिला. त्यांनी या क्षेत्रातील आपले वैयक्तिक अनुभव सांगतानाच, “फोटोग्राफी करत असताना पत्रकारितेची आणि छायाचित्रणाची नैतिक मूल्ये (एथिक्स) जपणे अत्यंत आवश्यक आहे,” असे आवर्जून नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत पाटील, अभिजीत पाटील, प्रकाश लिंगायत, अरुण इंगळे, जुगल पाटील, सचिन पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला जळगाव शहरातील आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार आणि डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार आणि लोकमाध्यम न्यूज चे संपादक पांडुरंग महाले आणि सौ. मीनाक्षी महाले यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करतांना महापौर दीपमाला काळे ,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, त्यांच्या समवेत मलाबार गोल्ड च्या स्टोअर मॅनेजर प्रियंका पाटील, सुजित नायर आणि प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधीपाल वानखेडे आदी.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button