पद्मश्री ॲड.उज्वल निकम यांचा जळगाव मध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा
सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांची माहिती

लोकमाध्यम न्युज जळगाव दि.२२ जुलै २०२५ :
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विधिज्ञ, विशेष सरकारी वकील, आणि नुकतेच राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेल्या पद्मश्री ॲड. उज्वल निकम यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार सोहळा दिनांक २७ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी ५ वाजता, छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ परिसर, जळगाव येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती पद्मश्री ॲड. उज्वल निकम नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष उद्योगपती जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक भाऊ जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या गौरव सोहळ्याचे आयोजन “पद्मश्री ॲड. उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समिती, जळगाव” यांच्यातर्फे करण्यात आले असून या सोहळ्यात कार्यक्रमास उपस्थित राहणारे प्रमुख मान्यवर पुढीलप्रमाणे : डॉ. एन. के. ठाकरे – माजी कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (सत्कार शुभहस्ते) , प्रमुख अतिथी – श्रीमती रक्षा खडसे – केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार , ना. गिरीश महाजन – मंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र , ना. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री, जळगाव , ना. संजय सावकारे – वस्त्रोद्योग मंत्री , ना. जयकुमार रावळ – पणन व राजशिष्टाचार मंत्री , विशेष उपस्थिती खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सर्वश्री
एकनाथराव खडसे, किशोर दराडे, सत्यजित तांबे, सुरेश (राजु मामा ) भोळे, किशोर पाटील, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, , विशेष अतिथी – आयुष प्रसाद जिल्हाधिकारी, श्रीमती मीनल करनवाल मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., महेश्वर रेड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक, . ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे आयुक्त तथा प्रशासक, म.न.पा. जळगाव हे मान्यवर उपस्थित असणार आहेत .
दिनांक २७ जुलै रोजीसकाळी ६.१५ वाजता – ॲड. उज्वल निकम यांचे जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना माल्यार्पण , स्वागत मिरवणूक : स्टेशन ते बॅरिस्टर निकम चौकपर्यंत ,भाजप कार्यालय, जी. एम. फाउंडेशन येथे छोटेखानी सत्कार सोहळा त्यानंतर सायंकाळी ५ वाजता – छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे मुख्य नागरी सत्कार समारंभ असेल .
नागरिकांसाठी मुक्त प्रवेश – सर्वांना हार्दिक आमंत्रण
हा कार्यक्रम सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला असून, ॲड.उज्वल निकम यांना गौरविण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सन्मान सोहळा समितीतर्फे करण्यात आले आहे.
पद्मश्री ॲड..उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समितीत सहभागी मान्यवर –
अशोकभाऊ जैन (समिती अध्यक्ष) भरतदादा अमळकर, नंदकुमार बेंडाळे, भालचंद्र पाटील, डी. डी. बच्छाव, ॲड.नारायण लाठी, अनिश शहा, करीम सालार, ॲड.सुशील अत्रे, शंभू पाटील, शिरीष बर्वे, नंदू अडवाणी, डॉ. राजेश पाटील, हरीश मुंदडा ॲड.सुरेंद्र काबरा डॉ. राहुल महाजन, राहुल पवार, जगन्नाथ बाविस्कर, ॲड.राजेश झाल्टे, दिलीप तिवारी, डॉ. प्रीती अग्रवाल, राम पवार, युसुफभाई मकरा, संतोष इंगळे, प्रमोद नाना पाटील, सुरेंद्र पाटील, श्रीराम पाटील, ललित चौधरी, जितेंद्र लाठी,रोहित निकम, संग्रामसिंह सूर्यवंशी, प्रकाश बालानी राजेंद्र नन्नवरे अरविंद देशमुख उज्वल चौधरी एजाज मलिक, संजय पवार, अशोक लाडवंजारी, राजेंद्र पाटील सुनील पाटील कल्पेश छेडा अमित भाटीया जितेंद्र पाटील, विरेंद्र पाटील, प्रशांत नाईक, रितेश निकम, अमर देशमुख, विकास भदाणे, हर्षाली चौधरी, डॉ. विकास बोरोले, मनीष चौधरी, रोहन बाहेती, अतुलसिंह हाडा, श्याम कोगटा, श्याम तायडे, नितीन लढ्ढा, बंडूदादा काळे, सुनील भंगाळे, दीपक सूर्यवंशी, राधेश्याम चौधरी, विनोद देशमुख, अभिषेक पाटील, शरद तायडे , डॉ. केतकी पाटील, सचिन नारळे, रविंद्र लढ्ढा, प्रीतम रायसोनी, अशोक राठी, पंकज जैन, गिरीश सिसोदिया, मनोज (पिंटू) काळे, गजानन (मामा) देशमुख, उज्ज्वला बेंडाळे, योगेश कलंत्री, सुरेश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, भीमराव मराठे, संतोष पाटील, राहुल तोडकर, ललिता पाटील, संगीता पाटील, सुनील मोर, अनिल अडकमोल, मनोज सोनवणे, विराज कावडिया,राजेश डी.पाटील
पद्मश्री ॲड.उज्वल निकम नागरी सन्मान सोहळा समिती, जळगाव.





