ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र नाना नेहते यांचे निधन; आज दिनांक 28 रोजी रात्री आठ वाजता अंत्ययात्रा

| लोकमाध्यम न्युज | जळगाव – येथील दैनिक बातमीदार चे मालक , मुद्रक व माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र नाना नेहते ( वय 74 ) यांचे आज 28सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 28/09/26 रोजी रात्री आठ वाजता त्यांचे गोलाणी मार्केट हनुमान मंदिर विसनजी नगर येथील निवासस्थान वरून निघेल. गेल्या काही काळापासून ते आजारी होते .जळगाव शहरातील पत्रकारीतेतील ते अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार व जाणकार होते. नरेंद्र नाना हे जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त होते .त्यांनी जुन्या काळात प्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा केला होता , त्यांचे मराठी भाषा आणि व्याकरणावर प्रभुत्व होते .नानांच्या मागे पत्नी , तीन मुली ,जावई , नातवंड व मोठे भाऊ असा परिवार आहे, ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि थोर संपादक कै. नानासाहेब वि. चा. नेहते यांचे चिरंजीव होते.






